agriculture loss by rain
sakal
पाचोड - दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा करण्याची घोषणा फोल ठरली असून एक महिन्याचा कालावधी उलटला, तरी अद्याप मदत न मिळाल्याने पैठण तालुक्यातील दहा मंडळातंर्गत ९६ हजार १९५ शेतकऱ्यांची दिवाळी अनुदानाच्या प्रतीक्षेत संपली. तलाठी व तहसील दरबारी शेतकऱ्यांच्या चकरा सुरु असुन तलाठीवर्गाकडून खातेदारांचे खाते क्रमांक जमा करण्यास दीरंगाई होत असून नेमके अनुदान कधी मिळेल यासंबंधी स्वतः तहसिलदारच अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.