
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल!
धाराशिव- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान नामदेवराव कोकाटे आणि प्रवीण आप्पासाहेब देशमुख यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश असूनही सभेचे आयोजन करण्यात आल्याने या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
मराठा समूदायाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. त्यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून त्याआधी ते वातावरण निर्मिती करत आहेत. धाराशिवमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमावबंदी असताना ही सभा आयोजित केल्याचा आरोप करत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय.
दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन केले, अशा मजकुराची फिर्याद वाशी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर कलम 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)