esakal | पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते ; अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण

पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते ; अशोक चव्हाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुंडलवाडी : पंढरपूरसारखी लॉटरी एकदा लागली म्हणून ती पुन्हा - पुन्हा लागणार नाही, असा टोला सार्वजनिक बांधकाम तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला. विधानसभेच्या देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपसाठी एक सट्टा तर कॉँग्रेससाठी विकासकामांची लढत असल्याचे ते म्हणाले.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुंडलवाडी येथे मंगळवारी (ता.पाच) झालेल्या जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. या मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर यांनी प्रामाणिकपणे विकासकामे केली. ही पोटनिवडणूक जिंकणे म्हणजे रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरणार आहे, असे चव्हाण म्हणाले. हा मतदारसंघ दत्तक घेऊन विकासकामांसाठी दोनशे कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला. ही निवडणूक पुन्हा पंढरपूरसारखी होईल, असे दिवास्वप्न भाजपला पडत आहे. पंढरपूरसारखी लॉटरी एकदा लागली म्हणजे ती सारखी लागेल, असे नाही. आम्ही ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर लढत आहोत. भाजपने वैयक्तिक टीका करण्यापेक्षा विकासकामांवर बोलावे, असेही ते म्हणाले.

नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, अब्दुल सत्तार, मसूदखान, बापूराव गजभारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संग्राम हायगले, उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, बाबाराव एंबडवार, उमेदवार जितेश अंतापूरकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, माजी नगरसेवक सयाराम नामतेश, श्रीनिवास जिठ्ठावार, गंगाप्रसाद कानकट्टे, राजेश करपे, दत्तू हमंद, विनोद कानकट्टे, नागणीचे सरपंच प्रतिनिधी संतोष आगळे आदींनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

loading image
go to top