latur
latur sakal

Latur News : जो तो बनतोय नेता ; काँग्रेस मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्त्यांची खदखद

काँग्रेस मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्त्यांची खदखद

निलंगा : ‘आम्ही पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या आहेत. प्रचारात कधी घरदार पाहिलं नाही, आता वेगळीच परिस्थिती झाली आहे. जो तो नेता बनतोय, गटबाजी वाढली आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे’, अशी खदखद काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

निलंगा येथे शुक्रवारी (ता.१९) काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष भाई नागराळे, सरचिटणीस मोइज शेख, प्रदेश सचिव अभय सोळूंके, मल्लिकार्जुन मानकरी आदींची उपस्थिती होती.

मेळाव्‍यात काही निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणाले, की शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकरांनी एकसंघ जिल्हा ठेवत काँग्रेस पक्ष मजबूत ठेवला. आम्ही तिसऱ्या पिढीपासून पक्षाचे काम करतो, आजची परिस्थिती काही विचारूच नका, नवीन कार्यकर्ते पक्षात आले, त्यांना जरूर घ्या पण आमचाही मान ठेवायला सांगा.

latur
Latur News : महायुतीच्या गर्दीत भाजपच्या कार्यकर्त्यांची घालमेल

तालुका पातळीवर गटबाजी वाढलीय, एका गटाचा नेता दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याला विचारात घेत नाही, हे थांबणे गरजेचे आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस निलंगेकर म्हणाले की, जुन्या निष्ठावंताचा सोबत घेऊन व नवीन आलेल्या तरुणांना सामावून घेऊन पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव निर्माण करणार आहे. कोणताही गट पक्षात नको, सर्वजण समन्वयाने काम करू, असे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com