Latur News : महायुतीच्या गर्दीत भाजपच्या कार्यकर्त्यांची घालमेल

जिल्ह्यातील नेत्यांतील गटबाजी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे दर्शनही कार्यकर्त्यांना दुर्लभ झाले आहे. महाजनांना लातूरला यायला वेळ नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घ्यायचा प्रश्न तर कोसो दूर आहे. यातूनच विविध समित्यांवरही निवडी रखडल्या आहेत.
latur news
latur news sakal

राज्यात महाविकास आघाडीनंतर महायुती सत्तेवर आल्यानंतर गत आठवड्यात महायुतीचा पहिला मेळावा लातूरमध्ये झाला. व्यासपीठावर मोठी गर्दी होती. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा संदेश यातून देण्यात आला. पण महायुतीच्या गर्दीत भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यभर सतरंज्या उचलणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जिवाची घालमेल होत असल्याचे दिसून आले. मोठा भाऊ असलेल्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसायलाही जागा नसल्याने त्यांना रस्त्यावरच उभे राहण्याची वेळ आली. महायुतीच्या काळात ‘अच्छे दिन’ कधी येणार, असाच प्रश्न या कार्यकर्त्यांना यानिमित्ताने पडला.

२०१९ च्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पक्ष वाढीसाठी श्रेष्ठींच्या आदेशानुसार सामान्य कार्यकर्ते राबले. भाजपची केंद्रात बहुमताची सत्ता आली; पण राज्यात शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याने सत्ता गेली. दीड वर्षापूर्वी पक्षश्रेष्ठींनी टाकलेल्या जाळ्यात पहिल्यांदा शिवसेना अडकली आणि राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटून या युतीला मिळाली. यातून राज्यात महायुती आली. तीन पक्षांच्या नेत्यांचे चांगले चालले आहे. पण खरी घुसमट वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्यांची होताना दिसत आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर वेगवेगळ्या समित्यांवर काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. पण ती फोल ठरली.

त्यात जिल्ह्यातील नेत्यांतील गटबाजी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे दर्शनही कार्यकर्त्यांना दुर्लभ झाले आहे. महाजनांना लातूरला यायला वेळ नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घ्यायचा प्रश्न तर कोसो दूर आहे. यातूनच विविध समित्यांवरही निवडी रखडल्या आहेत. जिल्हा नियोजन समित्यांवरील नियुक्तांतही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. आपल्या चार कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना कामाला लावले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी आणलेली कामे तातडीने त्यांचे मंत्री करीत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांची कामे मात्र होत नाहीत, अशी कुरबूर होताना दिसते.

latur news
Latur News : लातूरमध्ये विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणारे अटकेत

आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त अक्षता वाटपापासून ते केंद्राच्या योजना घराघरांपर्यंत पोचविण्याचे काम या कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी महायुतीचा मेळावा झाला.यानिमित्ताने चौदा पक्ष एकवटले. तेरा पक्षांच्या कार्यकर्त्यांना खुर्च्या देता देता जागेअभावी रस्त्यावर उभे राहण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यावर आली.

भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. ज्यांचे यादीत नाव तोच व्यासपीठावर असतो. पण या मेळाव्यात मात्र तेरा पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच व्यासपीठ भरून गेले होते. भाजपच्या शहराध्यक्षालाही खुर्ची मिळाली नाही. दुसऱ्यांची व्यवस्था करताना ते पडल्याने त्यांच्या पायाला मार लागला. पण कोणी उठले नाही. महायुती झाल्याने नेत्यांचे पुनर्वसन झाले, आपले कधी होणार असाच प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे.

यशाचे अनेक वाटेकरी, अपयशाला वाली कोण?

लातूर महापालिकेला पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेसाठी ५६४ कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर माजीमंत्री आमदार अमित देशमुख आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या समर्थकांनी आपल्याच नेत्याने हा निधी आणला असल्याचे जाहीर करून श्रेय लाटले. शहरात बॅनरबाजीही झाली. याचे काम कधी सुरु होणार व कधी संपणार हे कोणीच सांगू शकत नाही. शहराचे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

latur news
Latur News : लातूर जिल्ह्यातील २८ मंडळांतील शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा भरपाईची उत्सुकता

त्यात २०१८ मध्ये मलनिस्सारण योजनेसाठी १३९ कोटी रुपये मंजूर झाले होते ते काम पाच वर्षानंतरही अर्धवट आहे. बारा वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाला जागा मिळत नाही. रुग्णांची ससेहोलपट होत आहे. शहरातील कचऱ्याने नागरिक त्रस्त आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु होत नसल्याने अत्याधुनिक यंत्रणा धूळखात पडून आहे. हे नेत्यांचे अपयश नाही का?. या अपयशाला कोण जबाबदार हा खरा प्रश्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com