
आडुळ : नवरदेवासह नातेवाईक मुलगी बघायला आले, मुलगी नवरदेवासह नातेवाईकांना पसंत पडली अन कोणत्याही प्रकारची पुर्व तयार न करता आहे त्याच कपड्यावर लग्न लावून आणल्याचे प्रसंग बुधवारी (ता. ७) रोजी नांदर (ता. पैठण ) येथे घडले. आडुळ येथील हमीद हबीब पठाण हे त्यांचा मुलगा कलीम पठाण याला मुलगी बघण्यासाठी नातेवाईकांसह नांदर येथील मुनाफ सांडू पठाण यांची मुलगी सानिया पठाण ही बघण्यासाठी गेले होते.