
परळी वैजनाथ : माझे पिता आणि आपले नेता, गोपीनाथराव मुंडे हे पुण्यात्मा होते. त्यांनी आयुष्यभर कोणाचेही वाईट चिंतले नाही. लोकनेत्याला स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी सर्व भावंडे, सर्व परिवार गोपीनाथगडावर एकत्र आहे. याचा मुंडे साहेबांनाही मोठा आनंद निश्चितच होत असणार. वैभव म्हणजे गाडी, संपत्ती, पैसा हे नाही तर लाखोंचा जनसमुदाय आणि त्यांचे हे प्रेम हे खऱ्या अर्थाने आमच्या परिवाराचे वैभव आहे. कितीही यातना भोगण्याची वेळ आली तरी त्या जनतेच्या प्रेमासाठी आम्ही यातना भोगायला तयार आहोत. मात्र, या वैभवाला कोणाची दृष्ट लागू नये, अशी आशा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.