esakal | ट्रकखाली आल्याने युवकाचा मृत्यू! शहरातील कारखाना चौरस्तावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रकखाली आल्याने युवकाचा मृत्यू! शहरातील कारखाना चौरस्तावरील घटना

शहर पोलिस पुढील कार्यवाही करीत आहे.

ट्रकखाली आल्याने युवकाचा मृत्यू! शहरातील कारखाना चौरस्तावरील घटना

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

वसमत (हिंगोली) : वसमत शहरातील (Wasmat city) कारखाना रोडवरील चौरस्ता येथे ट्रकखाली आल्याने सुरेश मारकुळे हा ३३ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.१२) दुपारी ३ च्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. (A youth has died after falling under a truck at a crossroads on Karkhana Road in Wasmat city)

हेही वाचा: वसमत पोलिसांचा बाभुळगावात छापा; ४१ हजाराची दारु जप्त

पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता. १२) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच १५ बी.के ०१६६ हा लोडिंग ट्रक साखर कारखानाच्या दिशेने वसमत शहराकडे येत असताना जवाहर कॉलनी चौरस्त्याजवळ परिसरातील वडारवाडा येथील सुरेश रंगनाथ मारकुळे (वय ३३) वर्ष हा ट्रकच्या समोर आल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: वसमत पंचायत समितीमध्ये फुलली 225 झाडांची परसबाग

घटनेची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेतले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे हलवले आहे. रुखमाबाई रंगनाथ मारकुळे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस पुढील कार्यवाही करीत आहे. (A youth has died after falling under a truck at a crossroads on Karkhana Road in Wasmat city)

loading image
go to top