रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर घोषणा देत युवक काँग्रेसतर्फे निदर्शने

तुषार पाटील 
Friday, 11 December 2020

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता.११)  निदर्शने करण्यात आली.

भोकरदन (जि.जालना) : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता.११)  निदर्शने करण्यात आली. यावेळी बीड ,जळगाव ,परभणी, जालना व औरंगाबाद येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात तासभर घोषणाबाजी केली.

रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍याबद्दल  केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी केली या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख,सुरेश गवळी, गटनेते संतोष अन्नदाते, रमेश जाधव, विशाल गाढे, दीपक आगलावे, सोपान सपकाळ ,तालुकाध्यक्ष त्र्यंबक पाबळे रोशन देशमुख,, गौरव देशमुख यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

ई-सुविधा प्रणालीत वैयक्तिक माहिती भरण्यास विद्यापीठाची स्थगिती

फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील एका कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले होते की, कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक याबद्दल म्हणाले की, शेतकरी आंदोलनामागे खलिस्तानवादी आणि चीन आहेत, असा आरोप करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य ही सरकारची भूमिका आहे की वैयक्तिक भूमिका आहे, हे सरकारने स्पष्ट करावे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aandolan in front of Raosaheb Danve residence Bhokardan