aabha munde
sakal
परळी वैजनाथ - हैदराबाद येथील जी एम सी बालयोगी स्टेडियम येथे संपन्न झालेल्या २५ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत परळी तालुक्यातील डाबी येथील रहिवाशी असणाऱ्या व विद्यावर्धिनी विद्यालयात नववीचे शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग जलतरणपटू आभा गणेश मुंडे हिने जलतरणात दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर तब्बल ५ सुवर्णपदके पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.