esakal | औरंगाबादेत १८ वर्षांवरील नागरिकांचे ७० केंद्रांवर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 vaccine

औरंगाबादेत १८ वर्षांवरील नागरिकांचे ७० केंद्रांवर लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू केल्यानंतर आता मंगळवारपासून (ता. २२) १८ वर्षावरील नागरिकांना देखील लस मिळणार आहे. त्यामुळे आता लसीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाच्या निर्देशानुसार मंगळवारपासून १८ पेक्षा जास्त वयोगटासाठी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण सुरु केले जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

सत्तर केंद्रांवर लसीकरणाची सोय केली जाईल. प्रत्येक केंद्रावर दोनशे लशी दिल्या जातील, टोकन पध्दतीचा अवलंब केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडे कोव्हीशिल्ड लशींचा ५९ हजारांचा साठा आहे, तर कोव्हॅक्सिन लशीचा एक हजारांचा साठा आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा जाणवणार नाही व लसीकरणाला गती मिळेल, असे मानले जात आहे. दरम्यान प्रशासनाने लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांची नोंदणी करून त्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देऊन त्यांचे तत्काळ लसीकरण करण्यात येईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यातील रुग्णसंख्या प्रतिदिन साडेतीनशेच्या आत

थेट केंद्रावरच गर्दी-
राज्य सरकारच्या आदेशानुसार ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण महापालिकेने शनिवारपासून सुरू कले आहे. सोमवारी लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली होती. तसेच नोंदणीसाठी कोविन अ‍ॅपवर सकाळी आठ ते दहा अशी वेळ होती. पण कोविन अ‍ॅपवर नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी न करताच केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे अनेक केंद्रावर गोंधळ उडाला.

शंभर लस, दुपारीच संपल्या-
शहरातील ६७ केंद्रावर कोविशिल्ड लसीचा डोस दिला जात आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर लस पाठविण्यात आल्या. त्यामुळे या लस लवकर संपल्या. अनेकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले. काही केंद्रावर पुन्हा लस पाठविण्यात आली.

loading image