esakal | Corona Updates: मराठवाड्यातील रुग्णसंख्या प्रतिदिन साडेतीनशेच्या आत
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

Corona Updates: मराठवाड्यातील रुग्णसंख्या प्रतिदिन साडेतीनशेच्या आत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात सोमवारी (ता. २१) ३४८ कोरोना रुग्ण आढळले. जिल्हानिहाय रुग्णामध्ये बीड १२४, उस्मानाबाद ७६, औरंगाबाद ५४, नांदेड ३१, जालना २४, परभणी २१, लातूर १७, हिंगोली १ जणांचा समावेश आहे. आणखी २२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात बीडमध्ये पाच, औरंगाबाद- लातुरमध्ये प्रत्येकी चार, जालना-परभणीत प्रत्येकी तीन, उस्मानाबाद दोन तर हिंगोलीतील एकाचा समावेश आहे.

औरंगाबादेत ५४ बाधित-
औरंगाबाद जिल्ह्यात ५४ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील २०, ग्रामीण भागातील ३४ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५३० वर पोचली. बरे झालेल्या आणखी ७४ जणांना सुटी देण्‍यात आली. त्यात शहरातील १९ तर ग्रामीण भागातील ५५ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ४१ हजार १४६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९९३ जणांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात ‘मद्यपीराज’!

आणखी चौघांचा मृत्यू झाला. खुलताबाद येथील पुरुष (वय ६४), मुंडवाडी (ता. कन्नड) येथील पुरुष (८०), बजरंग चौक भागातील महिलेचा (७७) घाटी रुग्णालयात तर शहाबाजार भागातील पुरुषाचा (५७) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत ३ हजार ३९१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

loading image