esakal | Corona Vaccine: महाराष्ट्रात 50 हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोना लस - राजेश टोपे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

 जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व काही ग्रामीण रूग्णालय अशा 511  ठिकाणी कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

Corona Vaccine: महाराष्ट्रात 50 हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोना लस - राजेश टोपे

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : महाराष्ट्रात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी राज्यात 511 केंद्रावर कोरोना लसीकरण करण्यात येणार असून सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जालना येथे पत्रकारांशी बोलतांना दिली आहे. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, राज्यात ता. १६ जानेवारीपासून  कोरोना लसीकरणास सुरवात केली जाणार आहे. जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व काही ग्रामीण रूग्णालय अशा 511  ठिकाणी कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम शासकीय व खासगी रूग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

प्रत्येक केंद्रावर शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवस राज्यात पन्नास हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणासाठी कोव्हिन ॲपव्दारे एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी एसएमएस प्राप्त झाले आहेत, त्यांनी कोरोना लसीकरणासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top