esakal | पशुसंवर्धन विभाग झालं सज्ज; Bird Flu साठी 8 पथके तयार
sakal

बोलून बातमी शोधा

bird flu

जालना जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागा दक्ष झाले असून जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर 8 पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पशुसंवर्धन विभाग झालं सज्ज; Bird Flu साठी 8 पथके तयार

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : महाराष्ट्रातही कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागा दक्ष झाले असून जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर 8 पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत 175 कोंबड्यांचे नमुने पुणे प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकाही कोंबडी किंवा पक्षाचा संशयास्पद मृत्यू झालेला नाही, असे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.
 


जिल्ह्यात कुक्कूटपालनाचा व्यवसाय केला जातो. जिल्ह्यात सात ते आठ ठिकाणी पाच ते दहा हजार बाॅयलर कुकूट पालन व्यवसाय आहेत. त्यात जिल्ह्यात हैदराबाद येथून मोठ्या प्रमाणावर अंड्यांची आयत केली जाते. मात्र, महाराष्ट्रात २००६ नंतर यंदा बर्ड फ्लूची साथ आली आहे. जालना जिल्ह्याच्या शिजारील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग दक्ष झाले आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 8 पथकांची स्थापना करण्यात आले आहेत. स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक पथकामध्ये दोन पुशवैद्यकीय डॉक्टर व दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी म्हणून 175 कोंबड्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान जिल्ह्यात अद्याप एकाही पक्षाचा संशयास्पद मृत्यू झालेला नाही, असे पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील पक्षकांना बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता ही पशुसंर्धन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

जिल्ह्यात अद्यापि एका ही पक्षाचा संशयास्पद मृत्यू झालेला नाही. तसेच बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमिवर आठ पथके स्थापन करण्यात आले असून खबरदारी म्हणून १७५ कोंबड्यांचे नमून घेऊन पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
-अमितकुमार दूबे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय, जालना.

पीपीई किट मिळणार
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमिवर कोंबड्यासह इतर पक्षांचे स्वॅब घेतांना त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांना काही धोका होऊन नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पीपीई किट उपलब्ध करू दिल्या जाणार आहेत.

एका दिवसात होते मृत्यू
बर्ड फ्लू झालेली कोंबडी किंवा इतर पक्षांला ताप येतो. तसेच त्याचा सुमारे एका दिवसांमध्ये मृत्यू होते. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या पक्षांना बर्ड फ्लूची लागण होते, असे पुशसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पाणतळ्यांच्या परिसरीतील गावे लक्ष
पाणतळ्यांवर परदेशी पक्षांचे दरवर्षी आगमन होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील ज्या पाणतळ्यांवर परदेशी पक्षांचे आगमन होते, त्या पाणतळ्याच्या परिसरातील गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top