

Above-average temperatures are likely to delay the onset of winter chill across Marathwada in November.
esakal
परभणी: ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा ओसरत असतानाच आता हिवाळ्याकडे लक्ष लागले आहे. सध्या पहाटे हवेत गारवा जाणवू लागल्याने थंडीच्या आगमनाची चाहूल लागली आहे. असे असले तरी नोव्हेंबरचे हवामान काहीसे वेगळे संकेत देत आहेत. मराठवाड्यात दिवसासोबत रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज असल्याने गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.