Pachod Police : 17 वर्षाच्या मुलाकडून 4 वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार; पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल

यासंबंधी पोलिसांनी सदर संशयित मुलास ताब्यात घेतले असून बालसुधारगृह अधीक्षकासमोर त्यास उभे करण्यात येणार आहे.
Crime News
Crime Newsesakal
Summary

वडिलांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी ठाणे अंमलदारास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पाचोड : चार वर्षाच्या बालकावर एका सतरा वर्षाच्या मुलाने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी पीडित बालकाच्या पित्याच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार (Child Sexual Abuse) अधिनियमान्वये शुक्रवारी (ता. १०) रात्री गुन्हा दाखल केल्याची घटना कोळी बोडखा (ता. पैठण) येथे घडली.

यासंबंधी कोळीबोडखा (ता. पैठण) येथील चार वर्षीय पीडित बालकाच्या वडिलांनी पाचोड पोलिसांत (Pachod Police) शुक्रवारी (ता. १०) दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, घराशेजारी राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलाकडं आमचा चार वर्षीय बालक नेहमी खेळण्यासाठी जात असे. तेव्हा गावांतील शेजारी राहत असलेला तो मुलगा आमच्या चार वर्षीय बालकास घरात नेऊन त्याच्यासोबत अश्लिल चाळे करून अनैसर्गिक कृत्य करीत होता.

रविवारी (ता. पाच) पीडित बालकाच्या आईच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिने आपल्या पतीला शुक्रवारी (ता. १०) सांगितले, तेव्हा पित्याने आपल्या बालकाला यासंबंधी विचारले असता यापूर्वीही 'त्या' सतरा वर्षीय मुलाने बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे पीडित बालकाने सांगितले. हे ऐकून संतापलेल्या पित्याने आपल्या बालकास घेऊन सरळ पाचोड पोलिस ठाणे गाठले व संबंधित सतरा वर्षीय मुलाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.

Crime News
10th Student : लग्न रद्द झाल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थिनीचे चाकूने डोके छाटून, शरीराचे तुकडे करुन निर्घृण खून

सदर तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी ठाणे अंमलदारास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित मुलाविरुद्ध अनैसर्गिक कृत्य केल्याच्या कलमासोबत बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Crime News
Murgud Police : बातमी का दिली म्हणत भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; शिंदे गटाच्या राजेखान जमादारवर गुन्हा दाखल

हे मोबाईलचे दुष्परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधी पोलिसांनी सदर संशयित मुलास ताब्यात घेतले असून बालसुधारगृह अधीक्षकासमोर त्यास उभे करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपाविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com