

Bribe Demand for Running Spa Center Lands Police Personnel in ACB Net
esakal
-दिलीप गंभिरे
कळंब: स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी मासिक हप्त्याच्या स्वरूपात लाचेची मागणी करणाऱ्या कळंब पोलीस ठाण्यातील एका पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (ता.11) कळंब शहरातील होळकर चौकातून तांदळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गुलमोहर बिर्याणी हाऊससमोर करण्यात आली.या प्रकरणी अशोक दादाराव करवर वय 34, पोलिस अंमलदार यांना ताब्यात घेण्यात आले असून दुसरे पोलीस अंमलदार सिद्धेश्वर प्रकाश शिंदे वय 37 यांचा शोध सुरू आहे.