
हिंगोली : तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धोतराचा वापर करून ग्रीन नेट तयार करून सॅनिटायझर कक्ष तयार केला आहे. गावात प्रवेश करणाऱ्यांना सॅनिटराईज होऊनच गावात प्रवेश दिला जात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. गावोगाव लॉकडाउनमुळे बाहेरगावांतील नागरिकांना गावात प्रवेश बंदी केली आहे. गावातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे आवलंबविले जात आहेत.
सॅनिटायझर बसविण्यात आले
हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथे ग्रामपंचायतीने गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच धोतरापासून ग्रीन नेट तयार केले आहे. त्यात सॅनिटायझर बसविण्यात आले आहे. प्रत्येकाला सॅनिटराईज होऊनच गावात प्रवेश दिला जात आहे. सॅनिटराईजसाठी टाळाटाळ करणाऱ्यांना ग्रामस्थांना गावात प्रवेश नाकारला जात आहे.
सॅनिटायझर बसविण्याचा सर्वानुमते निर्णय
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ग्रामपंचायतीतर्फे कोरोनासंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन करून प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जात आहेत. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर बसविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
कर्मचाऱ्याची नियुक्ती
यासाठी ग्रामस्थांनी धोतर, नेट आणि बॅटरीवरील फवारे ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून दिले आहे. तेथे एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. गावात येणाऱ्यांना याच प्रवेशद्वारातून जाणे बंधनकारक आहे. गावकरी येताच कर्मचारी बटन सुरू करून सदरील व्यक्ती सॅनिटराईज होऊनच पुढे जातो.
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
या शिवाय गावात चारचाकी वाहनासदेखील बंदी घालण्यात आली आहे. हा उपक्रम पाहण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, नितीन दाताळ, गणेश वाघ आदींनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप
औंढा नागनाथ : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. एन. एन. मुळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप केले. या वेळी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंढे, पोलिस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे, जी. डी. मुळे, नगरसेवक सुमेध मुळे, रामभाऊ मुळे, डॉ. विमल बोरा, महेंद्र जोंधळे, रावजी नागरे आदींची उपस्थिती होती.
येथे क्लिक करा - व्हिडिओ: लघू, शेतीवर आधारित उद्योग सुरू व्हावेत: आनंद निलावार
गिरगावात घरोघरी सर्वेक्षण
गिरगाव: वसमत तालुक्यातील गिरगाव येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्याकडून गावात एक ते सहा वार्डात सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका सी. बी. पवार, एम. पी. होळकर, एम. टी. जोगदंड, पी. एन. दळवी, एल .बी. अन्नपुर्वे, आर. बी. खंदारे, पी. एम. वाहुळे, एस. एस. डोके, मदतनीस के. बी. रेनगडे, एस. सी. वाघमारे, आशा एन. बी. बारसे, सविता थळपते, सुनीता कऱ्हाळे, जयश्री हटेकर, सारिका भोसीकर आदींचा सहभाग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.