esakal | उस्मानाबादमध्ये बस - दुचाकीचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

उस्मानाबादमध्ये बस - दुचाकीचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

माकणी (उस्मानाबाद): परिवहन महामंडळाची बस व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाले. अन्य एकजण गंभीर जखमी झाला. माकणी-लोहारा मार्गवरील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पुलावर मंगळवारी (ता. १५) दुपारी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा आगाराची नागूर - उमरगा बस उमरग्याकडे परतत होती. विकास गोरे (रा. आशिव ता.औसा), दौलत चव्हाण (रा. लोहटा, ता. औसा), दादासाहेब गडकर (रा. माकणी) हे दुचाकीने मागणीहून लोहाऱ्याला जात होते. माकणीपासून एक किलमीटरवरील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पुलावर बस व दुचाकीची धडक झाली. त्यात दुचाकीवरील विकास गोरे, दौलत चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

जखमी झालेल्या गडकरला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. लोहाऱ्याचे पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोरे, एस. बी. साखरे, एल. आर. भोपळे, ए. व्ही. राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

loading image