esakal | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली: हिंगोली येथील अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पिपल्स बँकेजवळ मोंढ्यातून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीचा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला शनिवारी ता. १० दुपारी धक्का लागला. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी शासकिय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर गायकवाड यांचा ताफा शहरातील रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. त्यांचे वाहन पिपल्स बँकेजवळून जात असताना मोंढ्यातून भरधाव वेगाने पिकअप रस्तावर येत होते. यावेळी गायकवाड यांच्या ताफ्यातील स्कॉटींग व्हॅन पुढे गेल्यानंतर पिकअप चालकाने वाहन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. त्यामुळे वाहन पुढे गेले. मात्र पिकअपचा या वाहनाला पाठीमागील बाजूस असलेल्या कोपऱ्याला धक्का लागला. यामध्ये वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग थोडा घासल्या गेला.

हेही वाचा: परभणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांवर गुन्हा दाखल

सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही . या घटनेनंतर पोलिसांनी पीकअप चालकास ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले आहे . त्यानंतर पालकमंत्री प्रा . गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी करून नंतर शासकिय विश्रामगृह येथे आल्या नंतर पालकमंत्री गायकवाड याचे वाहनाने औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

loading image