esakal | हिंगोली-औंढा नागनाथ मार्गावरील अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हिंगोली-औंढा नागनाथ मार्गावरील अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली: हिंगोली ते औंढा नागनाथ जाणाऱ्या मार्गावर पिंपळदरी फाट्याजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ता. १६ साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील बाळु उर्फ नागोराव अंबादास भाग्यवंत वय ३२ हे कामानिमित्त हिंगोली येथे दुचाकी क्रमांक एम एच २६ यु २७५६ ने गेले होते ते हिंगोली येथील काम आटोपून परत गिरगाव कडे जात असताना हिंगोली ते औंढा मार्गावर असलेल्या पिंपळदरी फाट्या जवळ साडेचार ते पाच यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी औंढा पोलिसांनी भेट दिली. पुढील प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, बाळु उर्फ नागोराव हे स्वारातीम विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

loading image