Accident News : वैजापूर-गंगापूर रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत दोघे ठार; दोघे गंभीर | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News : वैजापूर-गंगापूर रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत दोघे ठार; दोघे गंभीर

वैजापूर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले ही दुर्घटना शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गंगापूर रस्त्यावर घडली.

सागर शिवसिंग राजपूत (वय २५ रा.परदेशी गल्ली), साहिल दत्तात्रेय पगारे (वय २२ रा.शिर्डी) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, शुभम साबळे (वय २० रा.पंचशील नगर), अजय दुशिंग (वय २२ रा.शिर्डी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, सागर राजपूत हा रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गंगापूर चौफुली येथून वैजापूरच्या दिशेने दुचाकीवर येत होता. त्यावेळी सभांजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीशी धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची

माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. या अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.