खासदार संजय जाधव यांच्या वाहनाला किरकोळ अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident to MP Sanjay Jadhav vehicle Laxmikant Kaje injured parbhani

खासदार संजय जाधव यांच्या वाहनाला किरकोळ अपघात

परभणी : खासदार संजय जाधव यांच्या वाहनाला शुक्रवारी (ता.२३) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अपघात झाला. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे वाहन व खासदारांची वाहन यांची समोरासमोर धडक झाली. यात महसूल कर्मचारी लक्ष्मीकांत काजे यांच्या मानेला दुखापत झाली. शिवाय दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीसाठी खासदार जाधव त्यांच्या स्कॉर्पियो वाहनातून जात होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर काजे यांचे वाहन व खासदार जाधव यांच्या स्कॉर्पियोची धडक झाली. जाधव यांनी काजे यांना रुग्णालयात हलविले.

Web Title: Accident To Mp Sanjay Jadhav Vehicle Laxmikant Kaje Injured Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :VehicleMarathwadaaccident