esakal | मुलींच्या भेटीनंतर पित्याचा अपघाती मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

होळीनिमित्त उत्साहाने आपल्या मुलींसाठी गाठीचा हार घेऊन जाऊन भेट घेऊन घरी परतणाऱ्या पित्याला अज्ञात वाहनाने धडक देऊन वाहन चालक वाहनासह पसार झाल्याची घटना अर्धापूर -तामसा मार्गावर लहान जवळ घडली आहे

मुलींच्या भेटीनंतर पित्याचा अपघाती मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : होळी व धुळवडीच्या निमित्ताने आपल्या मुलीची भेट घेऊन तिला साखरेची गाठी देऊन घराकडे परतणाऱ्या पित्यावर काळाचा घाला. स्व:च्या घरापासून काही अंतरावर आल्यानंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अर्धापूर ते तामसा रसत्यावर धुळवडीच्या दिवशी मंंगळवारी (ता. १०) दुपारी लहान येथे घडली. 

होळीनिमित्त उत्साहाने आपल्या मुलींसाठी गाठीचा हार घेऊन जाऊन भेट घेऊन घरी परतणाऱ्या पित्याला अज्ञात वाहनाने धडक देऊन वाहन चालक वाहनासह पसार झाल्याची घटना अर्धापूर -तामसा मार्गावर लहान जवळ घडली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालय नांदेड येथे दाखल केले असता त्यांना रुग्णालय सुत्रांनी मृत घोषित केले.

हेही वाचा१५ हजार ६९८ शेतकऱ्यांना वीज देण्याचे लक्ष निर्धारीत

घराजवळ येताच काळाचा घाला

लहान (ता. अर्धापूर) येथील भिमराव सोपान लोणे (वय ५२) हे मंगळवारी (ता. १०) होळी निमित्ताने आपल्या मुलींना दाभड (ता. अर्धापूर) व नांदेड येथील मुलीकडे होळीच्या गाठ्या घेऊन गेले होते. ते सायंकाळी लहान येथे घरी परत येत असतांना लहान बस स्थानकाजवळ असतांना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक देऊन वाहन चालक आपले वाहन घेऊन पसार झाला.

वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या अपघातात भिमराव लोणे गंभीर जखमी झाले. जखमी श्री. लोणे यांना त्यांच्या मुलांने घटनास्थळ गाठून इतर गावातील युवक व गावकर्‍यांनी मिळून त्यांना डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालय, विष्णूपुरी, नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांच्या रस्त्यातच मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रानी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला. त्यांच्या पार्थिवावर लहान येथे बुधवारी (ता. ११) अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत भिमराव लोणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई असा परिवार आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.