दोन ठिकाणी आपघात; तीन ठार

file photo
file photo
Updated on

परभणी : मानवतहून परभणीकडे येणाऱ्या भरधाव एसटी बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी (ता. तीन) रात्री साडेअकराच्या सुमारास परभणीजवळील पेडगाव फाट्यावर घडली. तर दुसऱ्या घटनेत मानवत राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ चारचाकी वाहनाच्या दुचाकीला झालेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. चार) घडली.पेडगाव (ता. परभणी) येथील विष्णू गोविंद जगाडे व दत्ता बाबूराव मोरे हे दोघे युवक सोमवारी रात्री काही कामानिमित्त शेतात गेले होते. शेतातून रात्री साडेअकराच्या सुमारास गावाकडे मोटारसायकलने जात असताना मानवतहून परभणीकडे भरधाव जाणाऱ्या एसटी महामंडाळाच्या बसने मोटारसायकलला  (एमएच १३ - सीयू ८३४३) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की यात दोघेही युवक जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परभणी ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात दोन्ही युवकांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केल्याचे पोलिस सूत्रांनी म्हटले.
दरम्यान, एसटीच्या चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार संजय गिते करीत आहेत.

 हेही वाचा -  कायद्याच्या कचाट्यातील  दुचाकी धूळखात !


चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


मानवत  (जि. परभणी) : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातात एका ४८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. चार) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. नागनाथ उर्फ नागेश मधुकरराव उन्हाळे (वय ४८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नागेश उन्हाळे हे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने (एमएच २२ - एएस ३६३९) पाथरीहून मानवतला येत होते. टोलनाक्यापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या वेगवान चारचाकीने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

कार्यवाही करावी
शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच्या मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून यामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता चांगला झाल्याने सुसाट वेगात वहाने पळवली जातात. यावर कोणाचेच नियंत्र नसल्याने वारंवार असे अपघात होतात. याबाबत महामार्ग पोलिसांनी वेगावर मर्यादा ठेवण्याबाबत वाहनधारकांना सुचना करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com