खून प्रकरणातील फरार आरोपीला पुणे जिल्ह्यातुन अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई

हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाणे बासंबा येथे सन २००७ मध्ये कलम ३०२ मधील गुन्ह्यातील आरोपी बबन उर्फ उत्तम मस्के रा. पारडा ता. जि. हिंगोली यास अतिरिक्त सत्र न्यायालय हिंगोली यांनी सन २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
हिंगोली पोलिसांची कारवाई
हिंगोली पोलिसांची कारवाई
Updated on

हिंगोली : खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना पॅरोल रजेवर आलेला परंतु मागील आठ वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देत आरोपी फरार होता. तो पुण्यात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व बासंबा पोलिसांनी आपले पथक रवाना करून सायबर सेलच्या मदतीने दबा धरुन बसलेल्या आरोपीला अटक केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाणे बासंबा येथे सन २००७ मध्ये कलम ३०२ मधील गुन्ह्यातील आरोपी बबन उर्फ उत्तम मस्के रा. पारडा ता. जि. हिंगोली यास अतिरिक्त सत्र न्यायालय हिंगोली यांनी सन २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेंव्हापासुन सदर आरोपी मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद येथे शिक्षा भोगत होता. खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना तो सन २०१३ मध्ये पॅरोल रजेवर जामिना बाहेर आला. परंतु रजा संपल्यानंतर परत जेलमध्ये न जाता तो फरार झाला होता. सदर आरोपीबाबत बासंबा पोलिस व हिंगोली पोलिस शोध घेत होते.

हेही वाचा - सेलूचे सामाजिक वनीकरण चालते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जीवावर

गुन्ह्यात ईतर आरोपींनी शिक्षेविरुध्द उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे फौजदारी अपील २०१२ मध्ये दाखल केला होता. सदर अपील निकाल खारीज झाल्याने अतिरीक्त सत्र न्यायालय हिंगोली यांनी आरोपीस अटक करुन न्यायालया समक्ष हजर करण्याचे आदेश दिले होते. आरोपी सन २०१३ पासून आपली ओळख बदलुन पुणे, नाशिक या परीसरात राहत होता.

आरोपी हा पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परीसरात नाव व ओळख लपवुन राहत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु, सहाय्यक उपनिरीक्षक श्री. पवार, श्री. वाळे, किशोर कातकडे, विठठल काळे, सायबर सेल सुमित टाले यांचे पथकाने मागील दोन दिवसांपासुन गोपनिय पध्दतीने विशेष मोहिम राबवुन आळेफाटा पोलिस ठाणे पुणे ग्रामिण येथील मधुकर पवार व त्याचे पथक तसेच उपनगर पोलिस स्टेशन नाशीक येथील पोलिस निरिक्षक श्री. शिंदे व त्यांचे पथक यांचे मदतीने मागील आठ वर्षापासुन खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व पॅरोल रजेवरुन फरार असलेला आरोपी बबन उर्फ उत्तम मस्के रा. पारडा ता. जि. हिंगोली यास अटक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com