
बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. हत्येची घटना नऊ डिसेंबरला घडली होती. या घटनेला सव्वा महिना लोटत आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. वाल्मीक कराड याने खुनाचा कट रचल्यावरून त्याचाही तपास विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) करीत आहे.