औरंगाबाद : आरोपींनी लाखो रुपयांचे टाकले दरोडे

सातव्या दरोडेखोराचा सुगावा लागलाः दोन खास पथके तैनात
आरोपींनी लाखो रुपयांचे टाकले दरोडे!
आरोपींनी लाखो रुपयांचे टाकले दरोडे!sakal
Updated on

औरंगाबाद : शिवारातील शेतवस्तीवर १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दरोडा टाकून महिलांवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दरोडेखोरांनी आजवर १० ते १५ ठिकाणी दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस तपासात ही माहिती उघड झाली असून पोलिसांनी २७ ऑक्टोबरअखेर सातपैकी एकूण सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा करून चार दिवस उसाच्या फडात लपून बसल्यानंतर मुंबईला ‘सेट’ होण्यासाठी म्हणून पळून गेलेला गेलेला सहावा आरोपी किशोर जाधव (रा. सोनई, जि. नगर, सध्या. रा. गिधाडा, ता. पैठण) याला कल्याण बसस्थानकावरून भल्या पहाटे बेड्या ठोकल्या होत्या. तो सोनईहून गिधाडा येथे ५ ते ७ वर्षांपासून राहायला आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आरोपी जाधव याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळांची आज पाहणी या सहा दरोडेखोरांनी केलेले जे गुन्हा आजवर उघड झाले आहेत, त्यासंदर्भात घटनास्थळांची पाहणी (स्पॉट व्हेरिफिकेशन) आज (ता.२८) करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपी किशोर जाधव हा अशा प्रकारचे दरोडे टाकून एक दिवस मूळ गावी जात असे, तो कुठे कुठे जाऊ शकतो हे जाणून घेतले असता, पोलिस तपासादरम्यान ही माहिती समोर आली.

आरोपींनी लाखो रुपयांचे टाकले दरोडे!
बिलोली : महागाईत लोटण्याचे भाजपकडून पाप पटोले

सातवा आरोपी करायचा ‘लीड’

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार प्रभू पवार आहे. प्रथम पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. असे असले तरी अद्याप फरार असलेला सातवा आरोपी हा या टोळीचे नेतृत्व (लीड) करत होता. तो सध्या लपून बसला असून त्याचाही सुगावा पोलिसांना लागला आहे. सुगावा लागल्यानंतर त्या सातव्या आरोपीच्या मागावर पोलिसांची दोन खास पथके तैनात करण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

सहाही जणांना एकमेकांची भेट नाही

१९ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर आजवर अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी तपासाच्या अनुषंगाने गोपनीयतेच्या कारणास्तव एकमेकांना अजूनही भेटू देण्यात आले नाही. यासंदर्भात गोपनीयता बाळगून तपास सुरू असल्याने सहाही आरोपींना वेगवेगळे ठेवल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com