
बिलोली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी, सर्वसामान्य, कष्टकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला जास्त मतदान करणाऱ्यांना गावजेवण देण्याची घोषणा केली होती. देशाला महागाई, बेरोजगारीच्या खायीत लोटायचे अन् खोटी आश्वासने देण्याचे पाप ते करीत आहेत. व्यापारी, धनदांडगे, अदानी - अंबानींना पोषक असणाऱ्या भाजप सरकारला जाब विचारा, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
विधानसभेच्या देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. २७) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
कॉँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शायर इम्रान प्रतापगढी, पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, अमर राजूरकर, माजी मंत्री रमेश बागवे, संजय लाखे पाटील, बाळासाहेब देशमुख, प्रा.यशपाल भिंगे, डॉ. मीनलताई पाटील खतगावकर, बापूराव गजभारे आदी उपस्थित होते.
प्रतापगढी यांनी शायरीच्या माध्यमातून भाषण केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव आहे. जाती - धर्माच्या नावाखाली भांडणे लावणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातील जनता खंबीर असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या राजवटीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले जाते. अशा मुजोरांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर मते मागण्याचे काम भाजपने बंद करावे, असे मिटकरी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.