गेवराई तालुक्यात बालविवाह, नातेवाइकांसह ५० जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

देवपिप्री येथील मंदिरात ११ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास विवाह आयोजित करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे विवाह झाला; परंतु वधू व वर यांचे वय विवाहयोग्य नसल्याने हा बालविवाह लावल्याप्रकरणी ग्रामसेवक रोहिणीकांत योगीराज घसिंग यांनी या प्रकरणाची सर्व माहिती घेत नंतर गेवराई पोलिसांत रितसर तक्रार नोंदवली.

गेवराई (जि. बीड) - तालुक्यातील देवपिंप्री येथे बालविवाहाचा प्रकार समोर आला असून अल्पवयीन मुलीचे गावातील मंदिरात लग्न लावल्याप्रकरणी नातेवाईक, भटजी व अन्य तीस ते चाळीस अशा पन्नास जणांवर गेवराई ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

देवपिप्री येथील मंदिरात ११ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास विवाह आयोजित करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे विवाह झाला; परंतु वधू व वर यांचे वय विवाहयोग्य नसल्याने हा बालविवाह लावल्याप्रकरणी ग्रामसेवक रोहिणीकांत योगीराज घसिंग यांनी या प्रकरणाची सर्व माहिती घेत नंतर गेवराई पोलिसांत रितसर तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलीचे लग्न लावणारे तसेच या लग्नात उपस्थिती लावून आशीर्वाद देण्यासाठी आलेले व लग्न लावणारे भटजी अशा ५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सतीश खनाळ, सुनीता खनाळ, सुंदर खनाळ (सर्व रा. माटेगाव), लहू मंचरे, शिवाजी मंचरे, मंदाबाई मंचरे, अंकुश मंचरे, गोपीनाथ मंचरे, अंजली मंचरे (सर्व रा. देवपिंप्री) भटजी व इतर तीस ते चाळीस जणांचा आरोपीत समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक टाकसाळ करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 50 people including child marriage and relatives in Gevrai taluka