क्वारंटाईन व्यक्ती विवाह, अंत्यविधीस हजर राहिल्यास कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

अंत्यविधीसाठी दहा आणि विवाह समारंभासाठी ५० लोकांना परवानगी असली तरी इतर जिल्ह्यातून, राज्यातून आलेली व्यक्ती अंत्यविधीस वा विवाह समारंभास हजर राहिली तर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

बीड  - अंत्यविधीसाठी दहा आणि विवाह समारंभासाठी ५० लोकांना परवानगी असली तरी इतर जिल्ह्यातून, राज्यातून आलेली व्यक्ती अंत्यविधीस वा विवाह समारंभास हजर राहिली तर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. केवळ वधु-वरांचे माता-पिता व निधन झालेल्या व्यक्तीचे सख्खे नातेवाईक यांना मात्र सूट असेल, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी (ता. नऊ) दिले. 

इतर जिल्ह्यातून वा बाहेरजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून २८ दिवस होम क्वारंटाईनचे नियम पाळावेत. जर अशी कोणतीही व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करत असल्यास किंवा सदरील कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास संबंधित व्यक्ती व ज्यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशा व्यक्तीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

दोन दिवसांपूर्वी शहरातील मसरतनगर येथे हैदराबादहून आलेल्या कुटुंबातील काही व्यक्तींना कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले. या लोकांनी शहरातील एका विवाह समारंभास हजेरी लावल्याचीही माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  विवाह समारंभात वधू-वरांचे आई-वडील तसेच अंत्यविधीस निधन झालेल्या व्यक्तीचे सख्खे नातेवाईक यांना अंत्यविधीला हजर राहण्याची सूट असेल. बाहेर जिल्ह्यातून वा परराज्यातून आलेल्या लोकांनी स्वत:हून होम क्वारंटाईन रहावे, अशा विधींना उपस्थित राहणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action if the quarantine person attends the funeral

Tags
टॉपिकस
Topic Tags: