esakal | होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

News about Elephants commit suicide Aurangabad News

मृत्यू जवळ आला की हत्ती आत्महत्या करतो, असा दावा वन्यजीव अभ्यासक असलेल्या चितमपल्ली यांनी केलेला आहे.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद - केरळातील एका गर्भवती हत्तिणीचा मृत्यू झाला. अनेकस्तरातून या घटनेचा निषेध होत आहे. काही टोळक्यांनी या हत्तिणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाण्यास दिल्याने त्याचा स्फोट होऊन तिचे तोंड रक्तबंबाळ झाले. त्यानंतर तिने नदीच्या पाण्यात उभे राहून आपला जीव सोडला. या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्यांनी तिला स्फोटके दिली त्यांचा निषेध केला जात आहे. त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी हत्तींविषयी नोंदवून ठेवलेले निरीक्षण तंतोतंत खरे ठरले. मृत्यू जवळ आला की हत्ती आत्महत्या करतो, असा दावा वन्यजीव अभ्यासक असलेल्या चितमपल्ली यांनी केलेला आहे. या घटनेमुळे तो सत्यात उरल्याचा दिसतो. हत्तींबद्दल अशीच रंजक माहिती खास eSakal.com च्या वाचकांसाठी.
 
काय म्हणतात मारुती चितमपल्ली
मारुती चितमपल्ली वनविभागाचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी आयुष्यातील उमेदीची वर्ष जंगलात काढली. प्राणी-पक्षी यांचे निरीक्षण करून त्यांच्या जगण्याचा भावविश्वाचा अभ्यास केला. आताही ते गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील आपल्या जंगलातील घरातच राहतात. वन्यजीव अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. हत्तींबाबत ते म्हणतात, ‘हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीनं त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तर घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथेच राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात.’ 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास
 
केरळमधल्या हत्तीनेही घेतली जलसमाधी
केरळमधल्या हत्तिणीच्या तोंडात जेव्हा स्फोट झाला. तेव्हा ती असह्य वेदनेसह तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. आपला मृत्यू जवळ आला आहे हे तिला कळाले. तिने नदीत सोंड बुडून जलसमाधी घेतली. तिच्या सोबत तिच्या पोटातील पिल्लूही गेले. एकूणच या घटनेमुळे चितमपल्ली यांचे निरीक्षण तंतोतंत खरे ठरले आहे. तिचे मरण नैसर्गिक नव्हते. माणसाने ते तिच्यावर लादले. 
 
हत्तिणीचा कळप मातृसत्ताक
हत्तींच्या कळपाचे नियंत्रण हत्तीण करते. कळपातले इतर तिच्या मागे चालतात, असेही निरीक्षण श्री. चितमपल्ली यांनी नोंदविले आहे. त्यामुळे हत्तींमध्ये मातृसत्ताक पद्धत असल्याचे स्पष्ट होते. मराठी विश्वकोशात हत्तींबद्दल म्हटले की, ‘हत्ती बुद्धिमत्तेच्या बाबतीत इतर प्राण्यांच्या संदर्भात तो वरच्या पातळीवर आहे. वन्य स्थितीतील हत्तीचे सामाजिक जीवन गुंतागुंतीचे असल्याने त्याला वर्तन व संवेदन यांविषयीची अनेक कौशल्ये शिकून घ्यावी लागतात. आफ्रिकन हत्ती किमान २५ भिन्न प्रकारे साद घालू शकतात, असे अभ्यासावरून दिसून आले आहे.

या प्रत्येक सादीला विशिष्ट अर्थ असतो. सामाजिक व्यवहारांत विस्तृत क्षेत्रातील भटकंतीमध्ये त्यांना या स्मृतींचा उपयोग होतो. कळपातील कुटुंबप्रमुख मादीला (सत्ताधारी मातेला) संपूर्ण कळपाची माहिती असते. स्थलांतराचे मार्ग, फळझाडे असलेली ठिकाणे आदी गोष्टी तिला माहीत असतात. ही माहिती ती कळपातील तरुण माद्यांना देते. पुढे यातील एक मादी तिच्यानंतर कुटुंबप्रमुख होते.’

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 
हत्तीची जीवन पद्धती
प्रौढ नर व माद्या बहुतेक काळ वेगळ्या राहतात. कुटुंबात माद्या व पिले असून, कुटुंब सरासरी दहा हत्तींचे असते. यात तीन-चार प्रकारचे नातेसंबंध असणाऱ्या माद्या व त्यांची संतती असते. यांमध्ये नवजात ते १२ वर्षांपर्यंतची पिले असतात. प्रत्येक कुटुंबाचे नेतृत्व सत्ताधारी मादी करते. नर प्रौढ झाल्यावर कुटुंबातून बाहेर पडतात. प्रौढ नरांचे इतर नरांशी घट्ट बंध नसतात. प्रौढ नर फक्त विशिष्ट प्रसंगी कुटुंबाला भेट देतात.
 

go to top