esakal | वसमत शहरातील मटका बुक्कीवर कारवाई; ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज
वसमत शहरातील मटका बुक्कीवर कारवाई; ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त
sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत पोलिसांच्या आशीर्वादामुळे शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत. ज्यात मटका, जुगार, लाॅटरी आदी अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याच्या तक्रारी थेट पोलिस अधीक्षकांपर्यंत पोचल्या. यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सतर्क करुन वसमत शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील कारखाना रोड पाण्याच्या टाकीजवळ सुरु असलेल्या मटका जुगारावर बुधवारी (ता. २१) कारवाई करुन ७२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरात मटका नावाचा जुगार सुरु असल्याबाबत माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २१) कारखाना रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ छापा मारला. यावेळी सदर ठिकाणी महेंद्र खेमाजी भालेराव राहणार वसमत, गजानन संभाजी वाघमारे रा. गणेशनगर वसमत, मतीन खान उर्फ शेरा रहेमतखान पठाण हे मटका खेळत असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ७२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलिस ठाणे वसमत शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - शहाजीनगर जिल्हा परिषद कॉलनी येथील राहत्या घरी सापळा लावून झेडपीच्या प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गुंडरे याला पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक एम राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिष देशमुख, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या या कारवाईने वसमत शहरात राजरोसपणे मटका सुरु असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे