esakal | नांदेड झेडपीतील लाचखोर महेश गुंडरेला न्यायालयीन कोठडीनंतर जामिन

बोलून बातमी शोधा

एसीबी ट्रॅप
नांदेड झेडपीतील लाचखोर महेश गुंडरेला न्यायालयीन कोठडीनंतर जामिन
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : थकीत देयके काढण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गणेशराव गुंडरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. २०) रंगेहात पकडले होते. त्याला बुधवारी (ता. २१) न्यायालयासमोर हजर केले अशता न्यायालायाने न्यायालयीन कोठडीनंतर जामिन दिला. भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत तक्रारदाराचे सन 2020 मध्ये थकीत 25 टक्के वेतन अदा करणे, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्त्याची देयक व महागाई भत्ता थकबाकी देयक काढण्याकरिता जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गणेशराव गुंडरे रा. शहाजीनगर, जिल्हा परिषद कॉलनी मालेगाव रोड, नांदेड यांनी 25 हजार रुपये लाचेची रक्कम ठरवून त्याचा पहिला हप्ता दहा हजार रुपये त्याच दिवशी म्हणजे ता. 16 एप्रिल रोजी स्वीकारुन उर्वरित 15 हजार रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी तक्रारदाराकडे केली. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीवरुन पडताळणी केली असता महेश गुंडरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा - नांदेड : पोलिस खिशात असल्याचा आव आणणाऱ्या गुटखा माफियांनी अनुभवली ‘वर्दीची ताकद’

त्यावरुन ता. 20 एप्रिल रोजी शहाजीनगर जिल्हा परिषद कॉलनी येथे सापळा लावून प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गुंडरे याला पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर सापळा कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुरी, सहाय्यक फौजदार संतोष शेटे, पोलीस अमलदार एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, नरेंद्र बोडके यांनी परिश्रम घेतले.