esakal | सावधान! तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

spitting

सावधान! तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर होणार कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण सेलने महानगरपालिका, नगरपालिका व जिल्ह्याच्या अन्य भागात सर्वेक्षण करून धूम्रपान व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आढावा बैठकीत ते होते.

यावेळी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्‍मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, तंबाखू नियंत्रण सेलच्या जिल्हा समन्वयक डॉ. माधुरी उटीकर, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वाघमारे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे श्री. शिंदे उपस्थित होते.
मागील वर्षीय तंबाखू नियंत्रण सेलने खूपच कमी प्रमाणात दंडात्मक कारवाई केलेली दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी महापालिका, नगरपालिका व जिल्ह्याच्या अन्य भागात वेळोवेळी सर्वेक्षण करून धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाईची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी व व्यसनास प्रतिबंध करावा. शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसरात धूम्रपान व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिली.

हेही वाचा: 'वारीला परवानगी नाही म्हणजे हिंदूंच्या आस्मितेवर घाला'

जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी या अधिनियम २००३ च्या कलम ४ व ६ ब नुसार काटेकोर पालन करून संस्थेच्या शंभर यार्ड परिसरातील तंबाखूची विक्री केंद्र प्रतिबंधासाठी योग्य ती कारवाई करावी; तसेच तंबाखू नियंत्रण सेलने व्यसनास प्रतिबंध करण्यासाठी महापालिका, नगरपालिका व जिल्ह्याच्या अन्य भागात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावा, असे आदेशही त्यांनी दिले. यावेळी डॉ. उटीकर यांनी कारवाईच्या संदर्भाने माहिती दिली.

loading image