Farmer : शेतीला पशुसंवर्धनाची जोड! योजनेतून संकरित गायी-म्हशीचे वाटप; ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

animal husbandry
animal husbandry

नांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अलिकडे बिनभरवशाचा झाला आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने योजनेच्या माध्यमातून शेतीला पशुसंवर्धनाची जोड देण्यासाठी सहा संकरीत गायी व म्हशींचे वाटप करण्यात येते.

animal husbandry
Mumbai: ...तर रस्त्यावर उतरू देणार नाही; शिंदे गटाच्या जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा

याशिवाय जनावरांसाठी गोठा तयार करणे, स्वयंचलित चारा कटाई यंत्र खरेदी करणे, खाद्य साठविण्यासाठी शेड व जनावरांचा विमा काढणे अशा विविध बाबी मिळून या प्रकल्पाची एकूण तीन लाख ३५ हजार रुपये किंमत आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांच्या गटांना ५० तर अनुसूचित जाती व जमातीच्या गटांना ७५ टक्के अनुदान देण्यात येते.

प्रत्येकवर्षी चांगले पीक होईलच याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती व्यवसायासोबतच इतर उत्पन्नाचे व्यवसाय देखील अंगिकारावे, यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न केले जात आहे. पशुसंवर्धन हा शेतीशी निगडीत चांगला व्यवसाय असल्याने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. अनुदानावर लाभार्थ्यांना संकरीत गायी, म्हशींचा पुरवठा केला जातो आहे.

animal husbandry
Pradip Kurundkar Case : तिच्या बोलण्यावर भाळला अन् नको ते सांगून बसला, DRDO चा शास्त्रज्ञ कसा फसला?

या योजनेंतर्गत सहा संकरित गायी व म्हशींचे वाटप केले जात असून, खरेदी करावयाच्या जनावरांची किंमती प्रती जनावर ४० हजार रुपये याप्रमाणे एक लाख ६० हजार रुपये इतकी आहे. जनावरांचा विमा काढण्यासह या प्रकल्पाची एकूण किंमत एक लाख ७० हजार १२५ रुपये अशी आहे.

शेळीपालन व्यवसाय योजना

शेळीपालन व्यवसायासाठी १० शेळी व एक बोकड देण्याची तरतुद आहे. यात उस्मानाबादी, संगमनेरी जातीच्या प्रती शेळी आठ हजार याप्रमाणे गटासाठी एकूण ९० हजार रुपये प्रकल्प किंमत आहे. स्थानिक जातीच्या प्रती शेळी सहा हजार प्रमाणे गटासाठी ६८ हजार रुपये प्रकल्प किंमत, विमा व सेवाकरासाठी उस्मानाबादी करीता १३ हजार ५४५ व स्थानिक जातीसाठी १० हजार २३१ रुपये. शेळ्याचे व्यवस्थापन चारा, खाद्य यावरील खर्च लाभार्थ्याला करावा लागतो. उस्मानाबादी करीता एक लाख तीन हजार रुपये व स्थानिक जातीकरिता ७८ हजार २३१ प्रकल्प किंमत आहे.

कुक्कुट पालन व्यवसाय योजना

मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कुक्कुट पालन व्यवसाय योजनेंतर्गत पक्षीगृह, स्टोअररुम, विद्युतीकरण करीता प्रकल्प किंमत दोन लाख रुपये, उपकरणे, खाद्य, पाण्याची भांडी, ब्रुडर करिता प्रकल्प किंमत २५ हजार रुपये असे एकूण दोन लाख २५ हजार रुपये या योजनेची प्रकल्प किंमत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com