Ashadhi Wari 2025 : मुक्ताई, मुक्ताई, आदिशक्ती मुक्ताई; बीड येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे उत्साहात स्वागत
Muktai Palkhi : आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी बीड शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाली असून, दोन दिवसांचा मुक्काम आहे. जयघोष, उभं रिंगण आणि आजोबा-नात भेटीच्या सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
बीड : श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड शहरात रविवारी (ता. २२) सकाळी अकराला आगमन झाले.