sand smuggling
sakal
देगलूर - गेल्या आठवड्यात एकीकडे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिक दीपावली साजरी करण्यात व्यस्त असताना रेती तस्करांनी मात्र तालुक्यातल्या शासनमान्य घाटावरून रेती तस्करी करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यात मग्न होते. यामुळे शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे. रेती तस्करांच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे हेही पुढे आणणे आवश्यक आहे.