esakal | ऑरिक हॉलच्या उद्‌घाटनाची प्रशासनाकडून जंगी तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

शेंद्रा एमआयडीसी : ऑरिक हॉलची सातमजली इमारत.

डीएमआयसीतील ऑरिक हॉलचे शनिवारी (ता. सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेंद्रा एमआयडीसीत जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या चकरांसह विविध किरकोळ कामे रात्रंदिवस सुरू असल्याचे चित्र मंगळवारी (ता. तीन) दिसून आले.

ऑरिक हॉलच्या उद्‌घाटनाची प्रशासनाकडून जंगी तयारी

sakal_logo
By
संताेष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : डीएमआयसीतील ऑरिक हॉलचे शनिवारी (ता. सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेंद्रा एमआयडीसीत जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या चकरांसह विविध किरकोळ कामे रात्रंदिवस सुरू असल्याचे चित्र मंगळवारी (ता. तीन) दिसून आले.


ऑरिक हॉलच्या समोरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्यात हेलिपॅड उभारणीचे काम मंगळवारी सुरू झाल्याचे दिसून आले. यासह ऑरिकच्या सातमजली इमारतीच्या उत्तरेकडील मुख्य रस्त्यावर सुमारे पाच-सहा एकरांत सभामंडप उभारणी करण्याचे काम सुरू आहे. यासह ऑरिक हॉलच्या मुख्य कामासह आजुबाजूची इतर किरकोळ कामे विविध कंत्राटद्वारांमार्फत जोरात सुरू आहेत. पंतप्रधानांसह विविध केंद्रीय किंवा वरिष्ठ मंत्री विशेष विमानाने येणार असले तरी कित्येक मंत्री जालना महामार्गाने येणार आहेत. त्यामुळे एमआयडीसीच्या जालना रस्त्यावरील मुख्य चौकापासून ते थेट कार्यक्रम स्थळापर्यंतच्या रस्ता दुभाजकांना रंगरंगोटीसह संपूर्ण रस्त्यांची साफसफाई मोठ्या प्रमाणात सुरू होती. याचबरोबर विविध विभागांच्या जबाबदार प्रतिनिधींच्या वारंवार चकरा व पाहणी अहवाल तयार करणे सुरू असल्याचे दिसून आले.

मुख्य चौकापासून कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी बुधवारपासून सुरू होणार असल्याचे समजते. या रस्त्यावरील वीजखांबांची दुरुस्ती व त्यावरील लाइट्‌सची कामे मंगळवारी सुरू होती. एमआयडीसीकडून रस्ता दुभाजकाच्या रंगरंगोटीसह त्यावरील झाडांच्या कुंड्यांना रंग देणे सुरू आहे. यासोबतच झाडांची छाटणी, जळालेल्या झाडांच्या ठिकाणी नवीन झाडी बसविण्याची कामे सुरू आहेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश गावडे व उपअधीक्षक विशाल नेहूल यांनी कार्यक्रमस्थळी भेट देत प्राथमिक माहिती घेतली. दोन दिवसांपासून दोन ठिकाणी पोलिस चौक्‍या उभारण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण, सुशोभीकरण सुरू आहे.

loading image
go to top