Video- कौतुकास्पद : मजूर स्व: खर्चातून वाटतो इडली- वडा

फोटो
फोटो

नांदेड : अठराविश्‍व दारिद्र्य नशिबी आलेल्या व पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून नांदेड शहरात आलेल्या मनोहर शिंदे या मजुरदाराने चक्क आपल्या घरखर्चातून पोलिस, आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत इडली वडा वाटप करत आहेत. त्यांच्या या दानशुरपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामासाठी त्यांनी आपला सर्व परिवार कामाला लावला आहे.

आदिवासी बहुल वस्ती असलेल्या वझरा बु. (ता. किनवट) येथे गरीब कुटुंबात जन्म घेतल्यानंतर अतिशय गरीबीत त्यांनी आपला उदरनिर्वाह चालविला. दरम्यानच्या काळात त्यांनी लग्न केल्यानंतर घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. हाताला मिळेल ते काम करुन ते कसाबसा आपला परिवार चालवत असत. परंतु गरीबी काही जात नव्हती. अखेर त्यांनी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन नांदेड गाठले. ते शिवाजीनगर परिसरात रवी भगत यांच्या घरी किरायाने मागील पाच वर्षापासून राहतात. 

त्यांना दररोज ३०० रुपये मजुरी मिळते

घरगाडा चालविण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात शेख नशिर यांच्या इडली- वड्याची हातगाड्यावर मजुरी करतात. त्यांना दररोज ३०० रुपये मजुरी मिळते. यातून ते आपला संसार चालवितात. मुलांचे शिक्षण आणि घरभाडे काढणे त्यांना अवघड जाते. तरीही ते काबाड कष्ट करुन हिंम्मत न हारता कामाला जातात. मागील चार वर्षापासून ते शेख नशिर यांच्याकडे कामाला आहेत. 

कर्ज काढून इडली- वडा बंदोबस्तावरील पोलिसांना 

दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच लहान मोठी दुकाने, फेरीवाले, हातगाडेवाले यांचे दुकान बंद झाले. त्यामुळे मनोहर शेंद्रे यांचा रोजगारही बंद झाला. आठ दिवस घरात बसुन काढले. पदरमोड करत खर्च करुन संसाराला कमी पडले तर चालेल मात्र नांदेडकरांसाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करणारे पोलिस, स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य विभागाच्या लोकांसाठी आपण काही तरी कतेले पाहिजे ही भावना उराशी बाळगुन त्यांनी चक्क कर्ज काढून इडली- वडा तयार करुन बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत गरम इडली वडा देत आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचा लहान मुलगा मदत करत आहे. 

घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन

लॉकडाउन संपेपर्यंत बंदबोस्तावर असलेल्या पोलिसांना इडली वडा देत राहील भले माझ्यावर अजून कर्ज झाले तरी चालेल. यावेळी मात्र त्यांनी नांदेडकराना आवाहन करत अयावश्‍यक असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका असा सल्ला देण्यास श्री. शेंद्रे विसरले नाहीत. त्यांच्या या कार्याचे शहरभर कौतुक होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com