पाचोड - छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यानंतर नांदर-दावरवाडी (ता. पैठण) येथील सुर्यतेज अर्बन पैठण मल्टिपल पतसंस्थेने अनेक ग्राहकांच्या ठेवी गिळंकृत करून पोबारा केल्याने पैठण न्यायलयाच्या आदेशावरून संबंधीत पतसंस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध पाचोड (ता. पैठण) पोलिस ठाण्यात अफरातफर व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.