
बीड जिल्ह्यातील परळी येथील मोंढा मैदानावर शनिवारी (ता.१२) शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
परळी (जि.बीड) : महाराष्ट्रात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील परळी येथील मोंढा मैदानावर शनिवारी (ता.१२) शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी ८१ किलोचा केक सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते कापून पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यानंतर ८१ किलो केक खाण्यासाठी उपस्थित नागरिकांसह लहान मुले तुटून पडली.
केक एकमेकांवर फेकून मारण्यात आला. काहींनी तो तोंडाला लावला. या दरम्यान बरेच जण व्यासपीठावरुन खाली पडले. हा सर्व प्रकार हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी हातात काठी घेऊन जमावाला पांगवले. मात्र यात ८१ किलो केक काही क्षणांत फस्त केला गेला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे.
संपादन - गणेश पिटेकर