Girl Child Celebration: चार पिढ्यांची प्रतीक्षा संपली; पाचव्या पिढीत लेक आली, दहिफळे कुटुंबाने ढोल-ताशांच्या गजरात केला जन्मोत्सव

Baby Girl Arrives After Four Generations In Dahiphale Family: चार पिढ्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या दहिफळे कुटुंबात पाचव्या पिढीत लेकीचे आगमन; ढोल-ताशांच्या गजरात रथातून काढली अनोखी जन्मोत्सव मिरवणूक
Parli Family Celebrates Baby Girls Birth After Four Generations With Grand Chariot Procession And Dhol Tasha

Parli Family Celebrates Baby Girls Birth After Four Generations With Grand Chariot Procession And Dhol Tasha

esakal

Updated on

-लक्ष्मण वाकडे

परळी वैजनाथ : गेल्या चार पिढ्यांपासून ज्या दहिफळे कुटुंबाला कन्यारत्नाच्या आगमनाची प्रतीक्षा होती, त्यांच्या पाचव्या पिढीत अखेर लेकीचे आगमन झाले. या कन्यारत्नाच्या जन्माने दहिफळे कुटुंबाच्या आनंदाला अक्षरशः पारावार उरला नाही. मुलीच्या जन्माचे स्वागत केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेत कुटुंबीयांनी नवजात कन्येची थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात रथातून मिरवणूक काढत तिचा जन्मोत्सव साजरा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com