जिल्हाधिकाऱ्यांचा दट्ट्या, एकाच दिवसात अकराशे शेतकऱ्यांचे आधार लिंक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल एक हजार 653 कर्जदार शेतकऱ्यांचा ठावठिकाणा बॅंकांना सापडत नसल्याची स्थिती आहे. यावरून योजनेचा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (ता. 13) घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी बॅंकांना चांगलाच दम भरला. यामुळे शुक्रवारी (ता.14) एकाच दिवसात तब्बल एक हजार 117 कर्जदार शेतकऱ्यांची खाती आधार लिंक झाली.

लातूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल एक हजार 653 कर्जदार शेतकऱ्यांचा ठावठिकाणा बॅंकांना सापडत नसल्याची स्थिती आहे. यावरून योजनेचा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (ता. 13) घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी बॅंकांना चांगलाच दम भरला. यामुळे शुक्रवारी (ता.14) एकाच दिवसात तब्बल एक हजार 117 कर्जदार शेतकऱ्यांची खाती आधार लिंक झाली. काही शेतकरी आधार क्रमांक देत नसल्याची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला स्वतः श्रीकांत यांनी फोन करून आधार क्रमांक मिळवला आणि अधिकाऱ्याचे पितळ उघडे पाडले.

या योजनेत दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ होणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व बॅंकांचे मिळून 72 हजार सहा शेतकरी पात्र ठरले आहेत. योजनेच्या लाभासाठी कर्जदार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक त्यांच्या कर्जखात्याशी जोडणी करणे बंधनकारक आहे. गेल्या काही दिवसांत बॅंकांनी 69 हजार 236 शेतकऱ्यांचे आधार क्रमांक मिळवून त्यांच्या कर्ज खात्याशी जोडणी केले. गुरुवारपर्यंत दोन हजार 770 शेतकऱ्यांचे आधार क्रमांक जोडणी झाले नव्हते.

मीन राशीच्या लोकांनी का राहावे सावध

आधार क्रमांक जोडणी करण्याची शुक्रवारी (ता.14) शेवटची मुदत होती. यामुळे शुक्रवारी एका दिवसात कोणत्याही स्थितीत राहिलेल्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्ज खात्याशी जोडणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. त्यावर बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी काही शेतकरी मृत, तर काहींचा ठावठिकाणा लागत नसल्याचे सांगितले. कॅनरा बॅंक व अन्य काही बॅंक अधिकाऱ्यांनी लाभार्थी शेतकरीच आधार क्रमांक देत नसल्याची तक्रार केली. त्यावर श्रीकांत यांनाही आश्‍चर्य वाटले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After One Call Farmers Account Linked To Adhaar