Valentine Day : कर्क राशीची आज परीक्षा, मीन-धनूवाल्यांनी राहा सावध

टीम ई सकाळ
Friday, 14 February 2020

हे वाचल्यानंतर तुम्ही प्रेमप्रकरणांतून उद्भवणाऱ्या समस्यांवर काही तोडगा काढू शकलात, तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वाचा 14 फेब्रुवारीचं राशीभविष्य

आजचा दिवस प्रेमाचा, प्रेमाच्या कबुलीचा. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कुणावर तरी प्रेम होतं. प्रत्येकाला ते कबूल करायची संधी मिळतेच, असेही नाही, पण आजच्या दिवशी प्रेमाची कबुली देणाऱ्यांवर त्यांच्या ग्रहदशेचा मोठा परिणाम दिसणार आहे. त्यामुळे आज असे काही करताना अगोदर वाचा आपले राशीभविष्य.

हे वाचल्यानंतर तुम्ही प्रेमप्रकरणांतून उद्भवणाऱ्या समस्यांवर काही तोडगा काढू शकलात, तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वाचा 14 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी

मेष - पाठीचे आणि मणक्याचे आजार असलेल्या तरुणांनी आज विशेष काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. प्रेमातल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त डोकं शांत ठेवा आणि अनावश्यक खर्च करू नका. घाईघाईनं निर्णय घ्याल, तर मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

वृषभ - आपल्या आयुष्यात अगोदर घडलेल्या घटनांचा त्रास करून घेऊ नका. आज तुम्ही आपल्या पार्टनरच्या सोबत चांगला वेळ घालवणार आहात. तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला आपल्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी वापरावी लागेल. तरीही आजचा दिवस चांगला जाईल.

मिथुन - आज काही वेळ का होईना, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातले त्रास विसरणार आहात. जिथे कुठे गुंतवणूक कराल, तिथे तुम्हाला चांगले रिर्न्स मिळतील. मोठा फायदा होईल, असे नाही, पण तोटा नक्कीच होणार नाही. फक्त अफवांपासून दूर राहण्याची गरज आहे. 

कर्क - तुमची प्रिय व्यक्ती आज तुमची परीक्षा घेणार आहे. मात्र, थोडे डोके वापराल, तर तुम्ही या परीक्षेतून चुटकीसरशी पास व्हाल. यामुळे जोडीदार खुश होईलच, पण तुम्हालाही मोठे समाधान मिळेल. 

सिंह - आज तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून वाद होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही शांतता ठेवा. आजचा दिवस आनंदाचा आहे. त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींवरून आपला मूड ऑफ करून घेऊ नका. 

कन्या - तुम्ही फार काळजी करणारे असाल, तरी जोडीदाराच्या बाबतीततही ओव्हर पझेसिव्ह होऊ नका. त्यामुळे जोडीदाराला असुरक्षित वाटू शकते. अती तिथे माती हे सूत्र लक्षात ठेवा, पण प्रेम मात्र भरभरून करा. 

तुळ - तुमच्यावर अजून तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट अवास्तव असेल, तर करायला धजावू नका. मित्रांच्या सहवासात आजचा दिवस घालवा. त्यामुळे तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. 

वृश्चिक - अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे कायम लोकांचे नुकसानच होत आले आहे. पण आज एक अफवाच सुखद बातमी घेऊन येईल आणि तुम्ही खुश व्हाल. शेवटा आयुष्यात आनंद महत्त्वाचा आहे, नाही का... 

धनु - तुम्ही जगातल्या मोजक्या सौभाग्यशाली लोकांपैकी एक आहात. तुम्ही पुष्कळ छंद जोपासले आहेत. त्यांच्याच साथीने तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधत असता. आताही तुम्हाला त्याच छंदांतून आनंद मिळेल, फक्त तुम्ही सकारात्मक राहण्याची गरज आहे. 

मकर - हट्टीपणा करू नका, नसता जोडीदार तुम्हाला कंटाळेल. आजच्या दिवशी आपल्या जोडीदाराचा खिसा हलका करण्याची नामी संधी तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही आपल्या मर्य़ादा ओळखून खर्च करा. 

कुंभ - जोडीदाराचा आनंद तुमच्यासाठी मोलाची गोष्ट आहे. पण कधी कधी तुम्ही त्यापेक्षाही मोलाची भेट देऊन जाता. तुमचा जोडीदारही तुमच्यावर अतिशय प्रेम करतो. आजचा दिवस त्याच्या सोबत आनंदात घालवा. 

मीन - तुमच्या जोडीदाराशी चर्चा करून पुढच्या भविष्याचे प्लॅनिंग करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. एखाद्या निसर्गरम्य स्थळाला भेट द्या. देवळात दर्शनासाठी जाण्यानेही तुम्हाला मनःशांती मिळेल. 

राज ठाकरे अडकले कुठे... वाचा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Day Horoscope Aurangabad News