रंग खेळून झालं, पण जीव गेला...अहमदपूरमधील धक्कादायक घटना | Latur Live News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

रंग खेळून झालं, पण जीव गेला...अहमदपूरमधील धक्कादायक घटना

अहमदपूर (जि.लातूर) : धुलिवंदनाचा रंग खेळून झाल्यावर खाद्यपदार्थ शिजवून खावा या बेताने शेत शिवारात गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा शुक्रवारी (ता.१८) तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथील उमर काॅलनीतील मोंढ्याच्या पाठीमागे दगडी वस्तू तयार करून उदरनिर्वाह करणाऱ्या होनवडज (ता.मुखेड, जि.नांदेड) येथील काही कुटुंबाची अस्थाई वस्ती आहे. या वस्तीतील अभिजित यल्लपा मोरे ( वय २० ) आपल्या इतर तीन मित्रांसह सकाळी रंग खेळून दहाच्या आसपास जवळच असलेल्या आनंदवाडी शिवारातील तळ्याजवळ खाद्यपदार्थ बनवण्याचे साहित्य घेऊन गेला. खाद्यपदार्थ बनवण्यापूर्वी हातपाय धुऊन घ्यावे म्हणून प्रत्येक जण तलावात तीन ते चार फूट अंतरावर जाऊन हातपाय धुवून वापस आले. (After Playing Color Youth Drowned In Pond In Ahmedpur In Latur)

अभिजीत हात धुण्यासाठी तळ्यामध्ये थोडासा अंतर अधिक गेला. जाताना सुखरूप गेलेल्या अभिजीतला वापस येताना तोच रस्ता लक्षात आला नाही. गेलेल्या रस्त्याच्या थोड्या फरकाने वापस येताना रस्त्यात असलेल्या आठ ते दहा फूट खोल खड्ड्यात तो बुडाला. दरम्यान बाजूच्या मित्रांनी आरडाओरड केला. जवळच असलेला एक व्यक्ती तिथे पळत आला. परंतु त्यालाही पोहता येत नसल्याने अभिजीतचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या संदर्भात अहमदपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप केंद्रे करीत आहेत. (Latur)

अहमदपूर (Ahmedpur) येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे नागनाथ उप्परबावडे, अजित लाळे, कैलास सोनकांबळे, प्रकाश जाधव, प्रशांत गायकवाड, संभाजी भालेराव व दोन मत्स्य व्यावसायिकांनी दुपारी दोन वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढला.

टॅग्स :LaturAhmedpur