Aurangabad Accident | औरंगाबादेत दुचाकी घसरुन अपघात; एक जण ठार, १ गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Accident News

Aurangabad Accident | औरंगाबादेत दुचाकी घसरुन अपघात; एक जण ठार, १ गंभीर जखमी

आडुळ (जि.औरंगाबाद) : धुलीवंदन सणाच्या दिवशी दुचाकी घसरुन झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) दुपारी एक वाजेच्या सुमारास काद्राबाद (ता.औरंगाबाद) शिवारात घडली. विकास बाबासाहेब भावले (वय २७) व बंडु नंदु पिवळ (वय २५, दोघे रा.आडुळ बु., ता.पैठण) हे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कचनेर फाट्याकडुन काद्राबादकडे दुचाकीने (एमएच २० एफएक्स २२१८) जात होते. नेमके त्यावेळी दुचाकीस्वार चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. (One Man Died, One Serious Injured In Accident In Aurangabad)

यात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. जखमींना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत विकास भावले याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. तर बंडु पिवळ हा गंभीर जखमी आहे.