

Kaigaon Police Action Two Men Booked After Country Made Pistol and Two Live Cartridges Recovered on Highway in Maharashtra
esakal
कायगाव : अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कायगाव शिवारात विनापरवाना गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. १९) दुपारी ही कारवाई केली. या कारवाईत गावठी कट्टा, काडतुसे, दोन मोबाईल आणि विना क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.