Latur Corruption News : मुख्याधिकाऱ्यासह नगररचनाकार जाळ्यात ; अहमदपूरला लाच घेताना पकडले

येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व नगर रचनाकार यांना पाच लाख रुपये लाच घेताना बुधवारी ( ता.१४ ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
Latur Corruption News
Latur Corruption News sakal

अहमदपूर : येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व नगर रचनाकार यांना पाच लाख रुपये लाच घेताना बुधवारी ( ता.१४ ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तक्रारदाराची तालुक्यातील मरशिवणी येथील तीन हजार सहाशे चौरस मीटर क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झाली. त्यात अंतिम परवानगी मिळण्यासाठी अहमदपूर नगरपालिकेत ता.२५ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रारदाराने ऑनलाइन चलन भरणा केला आहे.

परंतु त्यांच्या प्रलंबित कामाकरिता ता.५ फेब्रुवारी २०२४ ला पालिका कार्यालय ते गेले असता नगर रचनाकार संशयित अजय विजयकुमार कस्तुरे (वय ५५) याने स्वतःसाठी व मुख्याधिकारी यांच्यासाठी असे मिळून सात लाख रुपये लाचेची मागणी केली.

शासकीय पंचासमक्ष बुधवारी (ता. १४ ) लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात मुख्याधिकारी संशयित काकासाहेब सिद्धेश्वर डोईफोडे (वय ३९) व अजय कस्तुरे यांनी तडजोडीअंती पाच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर थोड्यावेळाने एका कारमध्ये तक्रारदाराकडून पाच लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने पकडले.

Latur Corruption News
Dharashiv : टॅंकरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार ; मैत्रीण गंभीर, येणेगूरला संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

ही कारवाई नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलिस अधीक्षक रमेशकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्या पथकाने केली. पुढील तपास लातूर विभागाचे पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com