लातूर जिल्ह्यातील शेकडो कोंबड्या कशामुळे मृत पावल्या? परिसरात भीती

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

एका व्यवसायिकांच्या कोंबड्या अचानक मरू लागल्या आहेत. यामुळे परिसरात उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे

अहमदपूर (जि.लातूर) : देशभरात कोरोनाची भीती असताना तालुक्यातील केंद्रेवाडी येथील कुक्कुटपालन एका व्यवसायिकांच्या कोंबड्या अचानक मरू लागल्या आहेत. यामुळे परिसरात उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांत व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले आहे.

केंद्रेवाडी येथील सदाशिव मुरलीधर केंद्रे यांचा शिवारातील गट नंबर 99 मधे कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे. अहमदनगर येथून 800 पक्षी त्यांनी दीड महिन्यांपूर्वी आणले. शनिवारी (ता.9)  दुपारपासून हे पक्षी अचानक मृत होऊ लागल्याने पक्षी वर्गीय जीवापासून मानवाला होत असलेला धोका लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनास तात्काळ माहिती सांगितली.

अर्ध्यावरती डाव मोडला... अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

घटनास्थळी प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी भेट दिली आहे. कोंबड्या अचानक आशा मृत्यू पावल्याने परिसरातील नागरिकांत उलट सुलट चर्चा चालू झाली आहे.

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पक्षी पाठवण्यात येणार असून परीक्षण अहवाल आल्यानंतर या पक्षाच्या मृत्यूचे कारण समजणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये - प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी.

 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmedpur news Latur hundreds of chickens in Kendrawadi dead